football information for betting फुटबॉल खेळाची मराठी माहिती Football details in marathi

एका सर्व्हेनुसार लक्षात आले आहे की फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे. फुटबॉल हा जगभरातील तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांचा आवडता खेळ आहे. हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो परंतु ब्राझील, स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना इत्यादी देशात या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते. फुटबॉल हा खेळ अमेरिका आणि कानाडा या देशात विशेष लोकप्रिय आहे. आजच्या लेखात आपण फुटबॉल खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत. फुटबॉल अतिशय रोमांचकारी व कौशल्यपूर्ण खेळ आहे. फुटबॉल Information in marathi mahiti पाहणार आहोत.
फुटबॉल शब्दाचा उगम कुठून झाला या विषयी लोकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचे मानणे आहे की या खेळात चेंडूला पायाने मारले जाते यामुळे या खेळाला फुटबॉल म्हटले जाते. परंतु या खेळाला हे नाव कुठून देण्यात आले याबद्दल पक्की माहिती उपलब्ध नाही. football information in marathi परंतु फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय संघटन फिफा च्या माहितीनुसार फुटबॉल हा चिनी खेळ सुजू चे विकसित रूप आहे. हा खेळ चीनमध्ये ‘ह्यां’ वंशाच्या काळात विकसित झाला होता. फुटबॉल खेळायला जपानमध्ये असुका वंशाच्या शासन काळात खेळले जायचे. त्यानंतर इसवीसन 1586 मध्ये जॉन डेविस नावाच्या एका जहाज कप्तान द्वारे हा खेळ ग्रीनलँड मध्ये खेळला गेला.
भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव ‘नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी’ आहे. त्यांना ‘भारतीय फुटबॉल चे जनक’ म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.
फुटबॉल खेळाच्या दोन टीम असतात प्रत्येक टीम मध्ये 11-11 खेळाडू असतात. एक सामना 90 मिनिटांचा असतो. यादरम्यान 45 मिनिटांवर एक 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. प्रत्येक टीम चे एक गोल पोस्ट असते आणि खेळताना फुटबॉल ला पायाने मारून दोघीही टीम चा उद्देश विरुद्ध पक्षाच्या पोस्टमध्ये जास्तीत जास्त गोल करणे हा असतो. जर खेळादरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला ‘इंजरी टाईम’ म्हणून काही वेळ खेळ थांबवण्यात येतो. football kheladu information in marathi
बॅडमिंटन खेळाची माहिती वाचा येथे
सुरुवातीच्या काळात फुटबॉल प्राण्यांच्या मूत्राशया पासून बनवण्यात यायचा. परंतु नंतरच्या काळात यात प्राण्यांची चामडी वापरली जाऊ लागली, ज्यामुळे फुटबॉलच्या आकार निश्चित झाला. आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या व मॅच, खेळाडू व मैदान इत्यादी गोष्टींना लक्षात घेऊन वेगवेगळे फुटबॉल तयार होऊ लागले. सामान्यता फुटबॉलचा परीघ 58 सेंटीमीटर पासून 61 सेंटीमीटर पर्यंत असतो.
फुटबॉल चे मैदान 100 मी, 64 मी पासून तर 110 मी, 75 मी पर्यंत चे आयताकार मैदान असते. मैदानाच्या लांबीला ‘साइड लाइन’ तर रुंदीला ‘गोल लाईन’ म्हटले जाते. मैदानाच्या मधोमध एक रेघ असते ही रेघ मैदानाला दोन भागात विभाजित करते. दोघी मैदानांच्या शेवटी 7.32 मीटर रुंद गोल क्षेत्र असतात. how to bet with vegas
फुटबॉल च्या खेळात दोन संघ व दोन गोल पोस्ट असतात. प्रत्येक संघाचा उद्देश विरोधी पक्षाच्या गोल पोस्टमध्ये फुटबॉल पाठवणे असतो.
फुटबॉल च्या प्रत्येक टीममध्ये 11 – 11 खेळाडू असतात.
फुटबॉलचा खेळ 90 मिनिटाचा असतो, ज्यात 45 मिनिटांनंतर एक ब्रेक होतो.
या खेळात जी टीम सर्वात जास्त गोल बनवते ती विजयी ठरते.
तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य होईल की जगातील 80 टक्के फुटबॉल पाकिस्तान मध्ये बनतात.
आतापर्यंत 20 फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आले आहेत. ‘या’ चिमुरड्याचं फुटबॉल कौशल्य पाहून अवाक् व्हाल!
फुटबॉल चा प्रथम विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता व आतापर्यंत सर्वात जास्त 5 फुटबॉल विश्व चषक जिंकणारा देश ब्राझील आहे.
विश्वचषकात फक्त 32 संघ देश भाग घेतात तर जगभरातील 211 देशांमध्ये फुटबॉल खेळले जाते. फुटबाल वर निबंध – वाचा येथे Essay On Football In Marathi Language – Hindi Screen Official
जगभरातून फुटबॉल विश्वचषक 100 करोड पेक्षा जास्त लोक पाहतात.
फुटबॉल खेळादरम्यान एक खेळाडू जवळपास 15 किलोमीटर पर्यंतची दौड लावतो.
भारतातील काही प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे आहेत. how to bet with vegas